Sunday, 3 June 2012

तीर्थजननी नर्मदापरिक्रमा

१२/११/२०११ पहाटे धर्मशाळेतील विहिरीवर स्नान केले गार गार पाण्याने नर्मदामैय्याची पुजा आरती करुन पुढे प्रस्थान ठेवले.बाहेर टपरीवर चहा घेतला टपरीवाल्यालाच पुढचा मार्ग विचारला,मोरटक्का-खेडीघाट याना जोडणार्या मैयावरील पुलाखालून मैय्याच्या किनार्यावरुन चालु लागलो.शेतासाठी लावलेल्या पाण्याच्या पम्प-मोटारीन्च्या वायरीन्चे जन्जाळ पसरलेले होते त्यातून वाट काढत चालावे लागत होते.थोड्याच वेळात रेल्वेचा पूल आला,छोटी टेकडी चढुन वर आलो. थोडे चाललो तेवढ्यात एका माणसाने हाक मारली,माताजी परिक्रमाका रास्ता उबड-खाबड होता है,बिना हातमे डन्डा लिये चलनेमे कठिनाई आएगी मै आपको डन्डा देता हु.उसने बाम्बुका डन्डा बनाके हम सबको दिया मैय्याके प्रेमका पहिला प्रमाण मिला.
            १०कि.मि.पर टोकसरका गोमुखाआश्रम आला,सकाळचे १० वाजले होते आश्रमाचे महाराज म्हणाले भोजनप्रसादी पावो फिर आगे बढना; आम्ही ठीक आहे म्हटले,धुतलेले कपडे वाळत घातले,आश्रमाच्या नोन्दवहीत  आमच्या नावाची नोन्द केली आमच्याकडील प्रमाणपत्राच्या वहीत त्यान्चा शिक्का मारून घेतला.आश्रम खुपच सुन्दर आहे.तिथे गायत्रीमन्दिर्,शिवमन्दिर आहे,एका कुन्डात गोदावरी प्रकट झाली आहे असे म्हणतात आमच्या नाशिकच्या गोदावरीचे{गन्गा} दर्शन झाले अगदी घरी आल्यासारखे वाटले. भोजनाला तिक्कड{गव्हाच्या जाड पोळ्या} आणि दाल{आमटी} होती.भोजन होत आले आणि एकजण महापुरण महापुरण असे म्हणत काहीतरी वाढायला आला,मला वाटले आपले गोड पुरण आहे पण महापुरण म्हणजे आता भोजन पुर्ण झाले यानन्तर काही मिळणार नाही.मजा वाटली.
      १२ वाजता पुढे निघालो.पीतनगर्,कान्करिया,अशी गावे पार करत मढी येथे पोहोचलो,प्रत्येक गावात लोक आदराने बोलावत चहा पाण्याचा भोजनाचा आग्रह करत. नमस्कार करीत. मढीच्या आश्रमात पोहोचत असताना मोठ्या नागराजाने दर्शन दिले,तो आम्हाला उजवी घालुन गेला,पण आमचीमात्र पाचावर धारण बसली. तिथे मुक्कामाला राहायचे नाही असे ठरवले.तसेही रावेर तिथुन फक्त ३ कि.मि. होते,चहा घेउन निघालो.
         शेतान्च्या बान्धावरुन शेतातुन वाट काढत चाललो होतो . आता ओढ होती आमच्या श्रीमन्त थोरले बाजिराव पेशवे यान्च्या दर्शनाची.रावेरला पोहोचण्यास ५ वाजले,सन्ध्याकाळ झाली होती.एका मुलीने सरपन्चान्चे घर दाखवले.त्यान्च्या पडवीत आसन लावले.त्यानी मोठ्या आदराने चहा-पाणी केले.बाजिराव राऊन्ची समाधी त्यान्च्या घरासमोरच होती,दर्शनाला गेलो.राऊबद्दलच्या अभिमानाने उर भरुन आला.डोळ्यातुन घळाघळा पाणी वाहत होते.समाधीपुढे नतमस्तक झालो.राऊ! तुम्ही होतात म्हणून आज आम्ही आहोत! फक्त ४०वर्शान्चे आयुश्य पण सुर्यासारखे तेजस्वी.
         खुप दमायला झाले होते.मैय्याची सान्जारती करुन भोजनप्रसाद घेतला.सरपन्चान्बरोबर खुप गप्पा झाल्या. समाधी लवकरच डुबणार आहे का? असे विचारले तेव्हा ते म्हणाले,नाही समाधी भोवती १०फुट ऊन्च सन्रक्शक भिन्त बान्धली जाणार आहे.अ‍ॅकुन खुप समाधान वाटले.आता विश्रान्ती.

Friday, 1 June 2012

तीर्थजननी नर्मदा परिक्रमा

१०/११/२०११.त्रिपूरीपॉर्णिमा होती.ओम्कारेश्वरगावात भक्त्तान्ची मान्दियाळी होती.खुप लोक पन्चक्रोशी परिक्रमा करुन आलेले होते.जागा मिळेल तिथे लोकानी आपला बाड-बिस्तारा लावला होता.तीन दगडाची चूल मान्डून स्वयम्पाक चालु होता.मी एका ठिकाणी बसुन पहात होते,बापरे! असा स्वयम्पाक करणे मला कसे जमणार?मी स्वतःशीच बोलले,बाजुला एक बाबाजी बसले होते; ते म्हणाले,बेटी मैय्याने आपकेलिये अलग काम तय किया है,खाना बनाना आपका काम नही परिक्रमामे आपको बना बनाया खाना मिलेगा ये मेरी बात याद रखो.मला मोठे आश्चर्य वाटले याना माझ्या कामाबद्दल कसे माहीत?आणि खरोखर्च सम्पुर्ण परिक्रमेत मला एकदाही स्वयम्पाक करावा लागला नाही.
                 ११/११/२०११.सकाळी सर्व आवरून आम्ही नर्मदेच्या दक्शिण तीरावरील गोमुख घाटावर आलो,जितेन्द्रशास्त्रीनी आम्हाला सन्कल्प पुजा सान्गितली.कढई गुरुजीन्च्या घरुनच करुन आणली होती,कन्या पुजन करुन त्याना हलवा{गोडाचाशिरा} दिला,नन्तर सर्वानी प्रसाद घेउन परिक्रमेसाठी प्रस्थान ठेवले.प्रथम नगरपालिकेच्या कार्यालयात जाउन प्रमाणपत्र घेतले.आणि मैय्याला{इथुन पुढे नर्मदेचा उल्लेख मैय्या असाच असेल.}उजव्या हाताला ठेवून चालायला सुरवात केली.आज १२कि.मि.वरील मोरटक्का येथिल जैन धर्मशाळेत मुक्काम करायचा होता.२कि.मि. चाललो असु-नसु मोठा भाग्याचा योग आला.श्रीगोन्दवलेकरमहाराजान्चे अनुयायी श्रीराममहाराज भेटले.आम्हाला पाहुन थाम्बले,आशीर्वाद दिला.म्हणाले,सामान बरेच घेतले आहेत चालणे कठीण जाईल काही सामान माझ्या आश्रमात ठेवा,परिक्रमा पुर्ण झाल्यावर घेऊन जा.मोरटक्क्याला मी भोजन घेउन येतो पोहोचलात की फोन करा.
     महाराजान्चे पटले,पाठपिशवी खुपच जड होती तरी गुरुजी म्हणाले म्हणून आम्ही काही सामान आधीच त्यान्च्या घरी ठेवले होते पण तरिही अजुन कमी करणे गरजेचे होते. निघता करता आधीच उशीर झाला होता डोक्यावर ऊन मी म्हणत होते रस्त्याच्या दुतर्फा झाडी असुनही घामाघुम झालो होतो.१२कि.मि.वरील मोरट्क्क्याच्या जैन धर्मशाळेत पोहोचण्यास दुपारचे ३ वाजले.तिथे खोली घेतली १००रू. श्रीराममहाराजाना फोन केला.ते अक्शरशः १०मिनिटात डबा घेउन आले.आम्हाला पोटभर होउन आणखी ४/६ जणाना अन्न पुरले.महाराजान्जवळ  बरेचसे सामान देउन बोजा हलका केला.आजचा मुक्काम जैन धर्मशाळा मोरटक्का.
नुकतीच नर्मदापरिक्रमा पुर्ण झाली.तो अनुभव सान्गावासा वाटतो.११/११/२०११ हा दुर्मिळ योग साधुन आम्ही उभयतानी परिक्रमा करायची असे ठरवले.९/११/२०११ला आम्ही शुलपाणिच्या झाडीतिल लखनगिरीबाबान्च्या आश्रमाला भेट देण्यासाठी गेलो.तो प्रवास,काय सान्गू! खूप छान अनुभव होता,मनोज मालविय आम्हाला तिकडे नेण्यासाठी आला होता आम्ही आमची गाडी आणली होती कारण आमच्याकडे आदिवासीन्साठी घेतलेले सामान होते.बडवानी ते मोरकट्टा हे अन्तर फक्त २५कि.मि. होते पण रस्ता इतका खराब होता की विचारु नका फक्त २५कि.मि. जाण्यास आम्हाला तब्बल ४तास लागले रात्र पडायला लागली होती पण आकाशात चॉदहवीका चान्द होता टिपुर चान्दणे पडले होते,गार वारा सुटला होता एक मोठी दरड उतरुन आम्ही मैय्याच्या{नर्मदानदी}किनारी पोहोचलो.थोड्याच वेळात नर्मदागिरीबाबा आम्हाला नेण्यासाठी बोट घेऊन आले,अशा बोटीत चढण्याचा पहिलाच प्रसन्ग होता,कसेबसे बोटीत चढलो,प्रवास सुरु झाला टिपूर चान्द्ण्यान्च्या प्रकाशात मैय्याचे विस्तीर्ण पात्र मोहक दिसत होते जणू मैय्याने चन्देरी साडी नेसली आहे.जलपान केले.जल नव्हते ते होते मधुर दुध हसत-खेळत चन्द्राच्या सोबतीने २तासाचा जलप्रवास करुन आम्ही लखनगिरीबाबान्च्या आश्रमात पोहोचलो.पुन्हा एकदा कसरत करुन बोटीतुन उतरलो.खुप दमलो होतो खिचडी खाउन मऊ-मऊ पान्घरुणात गुरफटून झोपलो,साध्या गवताच्या झोपडीवजा घरात इतकी किमती पान्घरूणे? बाबान्च्या भक्तानी दिली आहेत येणार्या पाहुण्यान्साठी.
सकाळी उठल्यावर पहिल्यान्दा ह्या पन्चरन्गी पोपटाशी ओळख झाली. नन्तर आश्रमाचा परिसर पाहिला लखन्गिरीबाबान्च्या समाधीचे दर्शन घेतले.लखनगिरीबाबानी ह्या जन्गलात आदिवासीन्साठी खुप काम केलेले आहे.१५०० फळा-फुलान्ची झाडे लावली आहेत्.गाई-गुरे साम्भाळली आहेत्,आश्रम-शाळा आहे.सायकलपम्पाच्या सहाय्याने नर्मदेचे पाणी वर खेचुन झाडाना घातले जाते,मोठ्या टाक्या बान्धलेल्या आहेत्.कडूभोपळ्याना बारीक छिद्रे पाडुन ठिबकसिन्चनाची सोय केलेली आहे.
     लखनगिरीबाबा नर्मदापरिक्रमा करत असताना या शुलपाणिच्या झाडीतुन जात असताना त्याना आदिवासीनी लुटले,तेव्हा याच ठिकाणी राहुन आदिवासीन्साठी काम करायचे ठरवले.दिवसातील २२तास ते काम करत असत.सरदार सरोवराच्या पाण्यात हा भाग बुडणार म्हणून त्यानी डोन्गरावरुन परिक्रमेचा मार्ग तयार केला.आदिवासीन्च्या शिक्शणाची सोय केली.
        गोड शिरा फोडणीचे चणे असा नास्ता करुन सर्वान्चा निरोप घेतला.पुन्हा एकदा बोटीत चढण्याची कसरत झाली उगवत्या सुर्यनारायणाला वन्दन करुन बड्वानीकडे निघालो.आता मैय्याने सुर्यकिरणान्ची सोनेरी साडी परिधान केली होती. यथावकाश ओम्कारेश्वरला पोहोचलो जितेन्द्रशास्त्रीन्कडे.त्रिपूरीपॉर्णिमा होती. दुसर्यादिवशी ११/११/२०११ला परिक्रमा सुरु करायची होती.