नुकतीच नर्मदापरिक्रमा पुर्ण झाली.तो अनुभव सान्गावासा वाटतो.११/११/२०११ हा दुर्मिळ योग साधुन आम्ही उभयतानी परिक्रमा करायची असे ठरवले.९/११/२०११ला आम्ही शुलपाणिच्या झाडीतिल लखनगिरीबाबान्च्या आश्रमाला भेट देण्यासाठी गेलो.तो प्रवास,काय सान्गू! खूप छान अनुभव होता,मनोज मालविय आम्हाला तिकडे नेण्यासाठी आला होता आम्ही आमची गाडी आणली होती कारण आमच्याकडे आदिवासीन्साठी घेतलेले सामान होते.बडवानी ते मोरकट्टा हे अन्तर फक्त २५कि.मि. होते पण रस्ता इतका खराब होता की विचारु नका फक्त २५कि.मि. जाण्यास आम्हाला तब्बल ४तास लागले रात्र पडायला लागली होती पण आकाशात चॉदहवीका चान्द होता टिपुर चान्दणे पडले होते,गार वारा सुटला होता एक मोठी दरड उतरुन आम्ही मैय्याच्या{नर्मदानदी}किनारी पोहोचलो.थोड्याच वेळात नर्मदागिरीबाबा आम्हाला नेण्यासाठी बोट घेऊन आले,अशा बोटीत चढण्याचा पहिलाच प्रसन्ग होता,कसेबसे बोटीत चढलो,प्रवास सुरु झाला टिपूर चान्द्ण्यान्च्या प्रकाशात मैय्याचे विस्तीर्ण पात्र मोहक दिसत होते जणू मैय्याने चन्देरी साडी नेसली आहे.जलपान केले.जल नव्हते ते होते मधुर दुध हसत-खेळत चन्द्राच्या सोबतीने २तासाचा जलप्रवास करुन आम्ही लखनगिरीबाबान्च्या आश्रमात पोहोचलो.पुन्हा एकदा कसरत करुन बोटीतुन उतरलो.खुप दमलो होतो खिचडी खाउन मऊ-मऊ पान्घरुणात गुरफटून झोपलो,साध्या गवताच्या झोपडीवजा घरात इतकी किमती पान्घरूणे? बाबान्च्या भक्तानी दिली आहेत येणार्या पाहुण्यान्साठी.
सकाळी उठल्यावर पहिल्यान्दा ह्या पन्चरन्गी पोपटाशी ओळख झाली. नन्तर आश्रमाचा परिसर पाहिला लखन्गिरीबाबान्च्या समाधीचे दर्शन घेतले.लखनगिरीबाबानी ह्या जन्गलात आदिवासीन्साठी खुप काम केलेले आहे.१५०० फळा-फुलान्ची झाडे लावली आहेत्.गाई-गुरे साम्भाळली आहेत्,आश्रम-शाळा आहे.सायकलपम्पाच्या सहाय्याने नर्मदेचे पाणी वर खेचुन झाडाना घातले जाते,मोठ्या टाक्या बान्धलेल्या आहेत्.कडूभोपळ्याना बारीक छिद्रे पाडुन ठिबकसिन्चनाची सोय केलेली आहे.लखनगिरीबाबा नर्मदापरिक्रमा करत असताना या शुलपाणिच्या झाडीतुन जात असताना त्याना आदिवासीनी लुटले,तेव्हा याच ठिकाणी राहुन आदिवासीन्साठी काम करायचे ठरवले.दिवसातील २२तास ते काम करत असत.सरदार सरोवराच्या पाण्यात हा भाग बुडणार म्हणून त्यानी डोन्गरावरुन परिक्रमेचा मार्ग तयार केला.आदिवासीन्च्या शिक्शणाची सोय केली.
गोड शिरा फोडणीचे चणे असा नास्ता करुन सर्वान्चा निरोप घेतला.पुन्हा एकदा बोटीत चढण्याची कसरत झाली उगवत्या सुर्यनारायणाला वन्दन करुन बड्वानीकडे निघालो.आता मैय्याने सुर्यकिरणान्ची सोनेरी साडी परिधान केली होती. यथावकाश ओम्कारेश्वरला पोहोचलो जितेन्द्रशास्त्रीन्कडे.त्रिपूरीपॉर्णिमा होती. दुसर्यादिवशी ११/११/२०११ला परिक्रमा सुरु करायची होती.
वंदना, धन्यवाद! तुमचे सर्व लेखही मी वाचते आहे. तुम्ही हल्ली बरेच दिवसात मात्र लिहिलं नाहीये ना!
ReplyDeleteयापैकी र रा गुण्ये यांचँ पुस्तक नक्कीच नाशिकला मिळेल. गोनीदांचं मात्र मिळणं कठीण आहे. कारण खूप वर्षात त्याची नवी आवृत्ती आलेली नाही.
परत परिक्रमेला जाताय हे वाचून खूप कौतुक वाटलं. कधीतरी परिक्रमा करायची खूप इच्छा आहे. पण या वर्षी मात्र नाही. कारण माझा मुलगा 12 वीत आहे. नंतर कधीतरी! तुमच्या बरोबर जायचा योग नशीबात आहे का पाहूया! तुम्हाला शुभेच्छा!