Monday, 24 February 2014

                        ॥ सार्थक जन्म-समर्पण अर्थात नर्मदाख्यान ॥

असूर सन्हारानन्तर थकून बैसले त्रिपुरारी।निढळावरचा घर्मबिन्दू एक टपकला भुमिवरी॥
त्या बिन्दुतुन प्रगटली एक कन्या सुन्दरी।कोण असशी गे मुली तू सुख देती हासरी॥
मी तर असे आपुलीच तनुजा बोले ती नमस्कारुनी।घर्मबिन्दु मधून आपुल्या जन्म माझा पावनी॥
दोन पुत्र असती आमुचे पण एक उणीव होती ऊरी।तुझ्या जन्माने सुरसे आज तिही झाली पुरी॥
आपुलीच गे पुत्री अपर्णे येई तू स्वीकार करी।येई गे मुली बैस अन्की हसुन बोले शर्वरी॥
दोन बन्धू एक भगिनी मोदे खेळती अन्गणी।सुखी ग्रुहस्थी पाहुन डोलती उमा आणि मदनारी॥
स्कन्द गजानन लपुन बैसती शोधतसे मन्दाकिनी।कोठे लपले बन्धू दोघे खुणे दाखविती त्रिपुरारी॥
विसरुनी सारी भवचिन्ता निश्चिन्त बैसले सदाशिव।नर्मम ददाति तू नर्मदे सदासर्वदा सुखी भव॥
आशिर्वचन दिलेत देवा हसुन बोले शर्वरी।नन्दिकेश्वर म्हणे देवा चला आता कैलासपुरी॥
उष्णप्रदेशी जन्मलेली ही मम कन्या कैसी ते हिम सहन करी।कुणा हाती सोपवू कोमलान्गी ही मम कुमारी॥
मेकलराज उभा राहिला हात जोडोनी सामोरी।सन्धि द्यावि मला दयाळा मनिषा आपली करीन पुरी॥
निर्धास्त झाले शिवपार्वती निघाले माघारी।देवाधिदेव सन्तोषले उजळली कैलासपुरी॥
मेकलसुता आता जाहली शिवकन्या सुन्दरी।विन्ध्य-सातपुडा दोन बन्धू सुखावले बहू अन्तरी॥
चुलबुली अवखळ होती म्हणुन रेवा म्हणती सारी।बाललिला पाहात तियेच्या आनन्दित सारी मेकलनगरी॥
दिवस चालले आनन्दाने मोठी झाली स्वरूप सुन्दरी।विवाह आता हिचा करावा मेकल्राज मनी विचार करी॥
योग्य वराचा शोध घेतसे भारतवर्षा माझारी।राजबिन्डा शोणन्रुप तो राज्य करीतसे शेजारी॥
सर्वार्थाने योग्य असे हा विचार आला न्रुपान्तरी।प्रस्ताव पाठवी मेकलराज शोणन्रुपाच्या दरबारी॥
निर्मल सुन्दर मम कन्येचा स्वीकार करावा राजेश्वरी।किर्ती एकुनी नर्मदेची शोण तिचा स्वीकार करी॥
कसा असेल राजपुत्र ?कोण योग्य वर्णन करी।जुहिला!प्रिय सखे पाहुन येई कैसा असे मम सख्याहरी॥
सजली धजली जुहिला नर्मदेसम पोषाख करी।पायीची नुपुरे झन्कारीत ठुमकत जातसे बाहेरी॥
पुर्वदिशेला वसली होती निसर्गरम्य शोणपुरी।वर्तमान जाणून घेण्या शोणन्रुपाचे आली जुहिला सेवेकरी॥
नटली सजली जुहिला देखुन स्तब्द झाला शोणसखा।स्वर्गिची वाटे अप्सरा मोहितसे मम चित्ता॥
राजबिन्ड्या शोणास पाहुनी जुहिला मनी हरखली।मदनबाणे विद्ध होवुनी कर्तव्य आपुले विसरली॥
येई गे सुन्दरी मम चित्तचकोरी शोणराजा हर्षला।मी नसे आपुली वधू असे न बोले ती जुहिला॥
गैरसमजाने पार पडला भव्य लग्न सोहळा।विसरुनी कर्तव्य आपुले रमली राणी ती जुहिला॥
बहुत दिन जाहले काहीच न कळे वार्ता।चिन्तीत होवुनी स्वतः निघाली मग ती शिवसुता॥
दुरुनच दिसला दिपोत्सव आसमन्त सजला धजला।स्वागतास आपुल्या नगरी सजली मनी हरखली शिवबाला
समीप जाता तिने देखिला दरबार तो भरलेला।सिन्हासनी बैसले होते शोणन्रुप अन राणी जुहिला॥
ह्रदयभेदक द्रुश्य पाहुनि क्रोधीत झाली नर्मदा।नर्मम ददाति ब्रिद आपले विसरुन होई ती क्रुता॥
अगे पापिणी मम दासी तू काय म्हणू मी तुला।क्रुतघ्न कामिनी आज शपिते बघ मी तुला॥
जलरूप व्हा याच क्षणी दोघे लागा पतित प्रवाहाला।थाम्ब जुहिले! दुर्गन्धीत होइल पाणी कुणी स्पर्शी तव जला
मी ही होते जलरूप जाते स्वदेश काजा।सन्तापाने गर्कन फिरली रेवा निघाली अस्ताचला॥
सुन्न होवुनी दुःखीत मने शोण प्रवाह पडला।उन्चावरुनी उडी घेऊनी पुर्वेकडे निघाला॥
जुहिलेचा प्रवाह राहिला त्याच ठिकाणी स्तब्द्सा।मेकलतली आजही आहे वाहता तो कसानुसा॥
नर्मदा मग जलरुप झाली ज्या स्थला।माईकी बगिया म्हणती आज त्या वनस्थला॥
दुःखीत रेवा विव्हल होऊनी गुप्त होतसे भूमित।मेकलराजही झाला किम्कर्तव्यमुढ अन दुःखीत॥
भुमिगत राहुनी नर्मदा करीतसे तपस्या।दिन महिने साल बारा पुरी झाली तपस्या॥
प्रसन्न झाले महादेव सान्ग म्हणाले मनी काय आहे तुझ्या।आपुलीच पुत्री मी पण काय नशिबी हे माझ्या॥
जनहितार्थ जन्म तुझा सुरसे शीघ्रही कार्यारम्भ करी।महानद असशी तू जल आता प्रवाहीत करी॥
आद्न्या प्रमाण पिताश्री धेय्य माझे मज कळले।कैक जन्मान्चे पुण्य माझे या जन्मी फळले॥
अमरकन्ठ राजधानी पर्वतमाथ्यावर वसली।रम्य मनोहर वने उपवने असे बहु ही सजली॥
मेकलराजा करी तयारी नर्मदावतरणाची।सुन्दर कुन्ड बान्धविले शोभा तिथे गोमुखाची॥
शिवस्मरण करुनी रेवा गोमुखाने कुन्डान्तरी प्रवेशली।सुन्दर स्वच्छ नीलजल रुपे प्रवाहीत ती झाली॥
निघाली ती सुरसरिता लोककाजा कारणे।खळ्खळ अवखळ नाचत निघाली पश्चिमेकडे॥
सुन्दर घनदाट उपवनी बसले होते कपीलमुनी।त्रुषा त्यान्चि शान्तविण्यावेगे तिने घेतली उडी॥
कपीलमुनी नम्रतेने करिते झाले अभिवादना।स्विकारुनी ते नम्रपणे पुढे निघाली पावना॥
घोर तपस्या त्या वनी करीत होते दुर्वासमुनी।पुढे निघाली जलदुग्धाने क्षुधा त्यान्ची शान्तवुनी॥
घोर काननी प्रवेशली मग आनन्दे तमसा।लोककल्याणास्तव प्रवास करितसे विपाशा॥
मार्गी मग तिला मिळाल्या कपिला अन करगन्गा।करन्जव्रुक्षराजीतुन गळा पडतसे कोमल कण्वा॥
तुडारमैय्या सवे घेवुनी चालली अमल्डेह मागे टाकुनी।रुषाही पडले मागे गोरखपुरास मिळे सिवनी॥
अगणित गावे अगणित नगरे पर्वत अन घनदाट जन्गले।फुलती उपवने फळती झाडे अनेक पक्षि गाती मन्गले
सुभिक्षीत करत चालली आनन्दित ती धरणी।पतितपावन जिची जलधारा तीच असे तीर्थजननी॥
मार्कन्डेय भ्रुगु वशिष्ठ कर्दम शौनकादि।नारद पिप्पलाद सनतकुमार नाचिकेत सनकादि॥
सर्व देव मुनि मनुज वन्द्या ही मानिनी।हर्म्यदा ही शर्मदा ही दिव्य वरदायिनी॥
जलचर नभचर अगणित सुन्दर पक्षीगण।सुखे राहती मत्स्य कच्छ अगणित मीन॥
भारहारिणी सुखदायिनी माता तीर्थशिरोमणी।भववारिधी भयहारिणि माता पतितपावनी॥
सत्य त्रेता द्वापार युगी होता मोठा सन्मान।नतद्रष्ट या कलियुगी मात्र सदा होतो अपमान॥
तरिही तुझे प्रेम माते लाभते सर्वा समान।नमस्ते नमस्ते मैय्या तव चरणी सदा प्रणाम॥
अमरकन्ठ नेमावर शुलपाणि।बान्दराभान गोराग्राम जमदग्नी॥
इन्द्रवरण तपोवन अन बुधनी।भाखा कवाट तसेच कडीपानी॥
असा चालला प्रवास शिवकन्येचा।पुर्वपश्चिम प्रवाहित दक्षिणोत्तर तीरान्चा॥
समय आला आता जीवन सान्गतेचा।समोर होता रत्नसागर सुन्दर तो साचा॥
दर्शनान्तरी मैय्या स्तब्द झाली क्षणभरी।नतमस्तक होवुनी उभी राहिली विमलेश्वरी॥
विनम्र अभिवादन करुन म्हणे पित्याला।सफल झाले मम जीवन आद्न्या द्यावी आता मला॥
नर्मदे तू महाभागा सर्वपापहरी भव।तव जलान्तरीच्या शिला सर्व होतील शिव॥
वन्दन करुनी मग पित्याला रेवा पुढे सरकली।रत्नसागरामध्ये मग ती सामावली॥
                             नर्मदे हर!नर्मदे हर! नर्मदे हर!





Friday, 14 February 2014

                                                तीर्थजननी नर्मदा परिक्रमा भाग-४
                   पायाचे फोड थोडे बरे वाटत होते म्हणून पुढे निघायचे ठरवले.सकाळी ७वाजता हॉटेल सोडले.मन्डला नाक्यावर येईपर्यन्त पाय  चालायला नाही म्हणू लागले पण तरिही चालत राहिले.किरहा टोला,जमुनिया,रहन्गी,रयपुरा,इमलय येता येता एक वाजला,पायाची आग होत होती,झाडाखाली बसले बुट काढुन पाहिले फोडावरची कातडी निघुन जखम झाली होती,मला डायबेटीस आहे,आता जास्त हुशारी करणे शहाणपणाचे झाले नसते.मी बसने मोहगावला गेले,तिथुन घुगरी,रामनगर मार्गे महाराजपुरला गेले.
                 दुसर्या दिवशी बसने लखनादौन मार्गे नरसिन्हपुरला गेले.रेल्वेस्टेशनवर गेले सन्ध्याकाळी ६वाजता राजेन्द्रनगर-कुर्ला गाडी होती.तिकिट काढले,गाडीत बसल्यावर टी.सी. कडून सीटही मिळाली.सकाळी नाशिकला पोहोचले.२३ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर असा आठ दिवसान्चा हा अनुभव खुप काही शिकवुन गेला.
                 पायाची अवस्था बघुन माझा एकटीने पायी परिक्रमा करायचा उत्साह  नाहिसा झाला होता.पाय बरा झाल्यावर कार्तिकी एकादशीला सोबतीने परिक्रमेला निघायचे ठरवले.
         २०११च्या परिक्रमेतील सहपरिक्रमावासी पुण्याचे माढेकर काका याना फोन केला.त्यानी पुण्याच्याच गोगटेकाका यान्चा फोन नम्बर दिला,बोलले गोगटेकाकान्शी.त्यानी सातार्याच्या आशा कुलकर्णी परिक्रमेला जाणार असल्याचे सान्गितले मग त्याना फोन केला त्या म्हणाल्या पिम्परीचिन्चवडचे श्री.रमेश खरे आणि सौ.अन्जली खरे हेही परिक्रमा करणार असल्याचे सान्गितले,त्याना फोन केला.२४ नोव्हेम्बरला ओम्कारेश्वरला गजाननमहाराज भक्तनिवासात भेटून बरोबर परिक्रमा करायचे ठरले.मी वन्दना परान्जपे,रमेश खरे,अन्जली खरे,आशा कुलकर्णी असे चौघे परिक्रमा करणार आहोत.
            पाय बरा झाला,रक्ताची तपसणी केली ब्लड शुगर लेव्हल नॉर्मल होती.पाठपिशवी लावुन रोज थोडे चालत राहिले. परिक्रमेची तयारी झाली.२३नोव्हेम्बरला सकाळी ८च्या नाशिक-इन्दोर बसने निघाले,दुपारी जुल्वानिया चौकडीला पोहोचले,खरगोन बस मिळाली.या प्रवासात ऊन गाव लागले,पुरातनकाळी हे राजधानीचे ठिकाण होते,येथे ९९ मन्दिरे,९९ विहिरी आहेत त्या काळातील.गाडीतुन काही मन्दिरे पाहता आली. खरगोनला पोहोचल्यावर लगेच ओम्कारेश्वरची बस मिळाली बस सुल्रागाव,अन्जरुद,कोठी मार्गे ओम्कारेश्वरला आल्याने माझी परिक्रमा खन्डीत झाली नाही.बस ८वाजता ओम्कारेश्वरला मेळा स्थानकावर पोहोचली.कार्तिक मेळा सुरु  होता खुप गर्दी होती.  भक्तनिवास ३कि.मि. दुर होता,निघाले चालत.वाटेत एका मुलाने मोटरसायकलवर लिफ्ट दिली त्यामुळे १० मिनिटातच भक्तनिवासात पोहोचले.रुम घेतली,सकाळी आशाताई आणि मन्डळीन्ची भेट होणार होती.आणि २५ला,परिक्रमा प्रारम्भ.मन उचम्बळून आले आहे.       
                                                         
                                                               तीर्थजननी नर्मदा परिक्रमा
सकाळी स्नान पुजा आटपुन बनकरान्चा निरोप घेउन पुढे वाटचाल सुरु केली.सम्पुर्ण रस्ता डाम्बरी असल्याने काही त्रास नव्हता पण भेटणारे एकटीच चालते आहे म्हणून टोकत,मन दोलयमान होत असे.तरेरा,रामनगर,बरबजपुर,रुसा येथे पोहोचले त्यावेळी दुपारच्या भोजनाची वेळ झाली होती रायभोजनालय पाटी दिसली म्हणून शिरले.सौ.कमलेश दिनेश राय यानी दाल-चावल ताजे करुन मला वाढले.तिथेच कपडे वाळत घालुन २वाजेपर्यन्त विश्रान्ती घेऊन पुढे निघाले.राय यानी भोजनाचे पैसे घेतले नाहीत परिक्रमावासी म्हणून उत्तम आदरातिथ्य केले.गोरखपुरला पोहोचण्यास सन्ध्याकाळचे ५ वाजले.भारती ठाकूर यान्च्या नर्मदापरिक्रमा या पुस्तकात उल्लेख असलेल्या सतिश शर्मा यान्च्या घरी आसन लावले.मुळचे पन्जाबीपन्डीत कुटुम्ब,फाळणीच्यावेळी येथे स्थाईक झाले.व्रुद्ध माताजी,तीन मुलगे आणि परिवार आहे.सतिशची पत्नी सत्किर्ती,मोठे सेवभावी कुटुम्ब.
          सकाळी पुढे,सतीश-सत्किर्ती खुप लाम्बवर आले                  होते.चन्दना,मोहतरा,पिन्जराटोला,डोन्गरीटोला,राम्नगर,कनकधारा,मोहतरा,रत्ना येथे रस्त्यावर एक सिद्धकुटी मन्दिर होते ऊन खुप लागत होते दमलेही होते दर्शन घेउन थोडी विश्रान्ती घ्यावी म्हणून गेले,सिद्धबाबा म्हणजे आपले शेगावचे गजाननमहाराज अगदी घरचे माणूस भेटल्याचा आनन्द झाला.नमस्कार करुन प्रार्थना केली.ओट्यावर बसले.काही लोक आले,चौकशी झाल्यावर पुन्हा तेच एकटीने कशाला चालायचे वगैरे.आज तळपायाला फोड आले आहेत.गाडासराई आले,काल दिनेश राय यानी डाक्टर विजय चौरासिया यान्चे नाव सान्गितले होते म्हणून त्यान्च्याकडे गेले,दुपारचा १वाजला होता भोजन करुन पुढे जावे असा विचार होता पण माझ्या पायाला आलेला फोड पाहुन त्यानी राहण्याचा आग्रह केला,त्याना जबलपुरला जायचे होते रात्री परत येणार होते,लावले आसन.त्यान्चा पत्नी, मलगा नवीन,त्याची पत्नी,मुले अन्शिका,अन्कीत सारे कुटुम्ब मोठे लाघवी.
       सकाळी पुढे निघाले,तीन कि.मि. गेले तोच मागुन नवीन मुलाना घेऊन आला,मी निघाले तेव्हा ती झोपली होती म्हणुन मी त्यान्चा निरोप न घेता निघाले तर त्यानी उठल्यावर रडून गोन्धळ घातला की आजी आम्हाला न सान्गता का गेली म्हणून नवीन त्याना घेऊन आला होता. एका दिवसाच्या सहवासात हे कुटुम्ब माझे नातेवाईकच झाले.बरगाव,सागरटोला,केवलारी,सुनपुरी,बोदर,बिझौरी,खरगेना येथे सन्त कबीर भोलेनाथ मन्दिर आहे.हर्रा,कारोपानी,येथे काळ्याहरीणान्चे अभयारण्य आहे.गिधा येथे सन्जीव मरकाम यान्चा सन्दर्भ मिळाला होता म्हणून गेले पण त्याना बाहेरगावी जायचे होते त्यामुळे चहा घेउन निघाले.गोमती ही स्वछ प्रवाहाची नदीमैय्या होती.किनार्यावर महेशसिन्ग राठौर यान्चे चन्द्रमौळी घर-ढाबा होता त्यानी हाक मारली,गेले.चहा झाला थोडी विश्रान्ती घेतली.महेशसिन्ग यान्चा मुलगा मुरली हा लहान असताना खुप आजारी होता तेव्हा त्याच्या आजीने नवस केला मुलगा बरा होऊदे त्याला घेउन नर्मदामैय्याची पायी परिक्रमा करेन.मनेन्जायटीस झालेला मुरली बरा झाला,तो आणि त्याची आजी यानी परिक्रमा केली.
        पुढे निघाले.कुडागाव,बिछिया,महवीरटोला,सिमरिया,घानाघाट गेले.दिन्डोरी २कि.मि. रहिले होते आजची चाल ३०कि.मि. झाली होती.पायाचा फोड फुटला,बुट काढले ड्रेसिन्ग केले.पण चालणे अशक्य वाटू लागले. कशीतरी चालत दिन्डोरीला पोहोचले.चार दिवसात मी ८०कि.मि. चालले होते.उद्या कोजागिरी पौर्णिमा आहे.एक दिवस विश्रान्ती घ्यावी म्हणून धर्मशाळेत न जाता हॉटेल अनुराग मध्ये राहिले.       

Thursday, 13 February 2014

परिक्रमा पुर्ण होण्यास १३९ दिवस लागले,प्रत्येक दिवस निराळा होता.प्रथम मी एकटीनेच २५/१०/२०१२ला अमरकन्टक येथुन सुरवात केली,नाशिकहुन हावडामेलने २३/१० ला निघाले दुसर्यादिवशी दसरा होता,नागपुरला धम्मचक्रप्रवर्तन दिनाच्या सोहळ्यासाठी जाणार्यान्ची प्रचन्ड गर्दी होती रिझर्वेशनचा काहिही उपयोग नव्हता,नागपुरला सर्व गर्दी उतरली जागा झाली.रात्री दोन वाजता विलासपुरला उतरले अमरकन्टकसाठी पेड्रारोडला जाणारी रेल्वे सकाळी सहा वाजता होती,मैय्याच्या मदतीचा अनुभव येण्यास सुरुवात झाली,अमरकन्टकला राहणारा गोन्दियाला नोकरी करणारा तरुण राम भेटला त्यानेच तिकीट काढुन माझे सामानही गाडीत ठेवले,पेड्रारोडला उतरल्यावर जीपमध्येही ठेवले सकाळी नवुवाजता अमरकन्टकला पोहोचले.२०११/१२च्या पहिल्या परिक्रमेत श्री भजनान्दस्वामी ट्रस्ट्च्या म्रुत्युन्जय आश्रमात आम्ही उतरलो होतो मी तेव्हा आजारी होते,आश्रमातील स्वामी हरिहरानन्द यानी आणि सेवेकर्यानी माझी तेव्हा खुप काळजी घेतली होती म्हणून तिथेच गेले माझे छान स्वागत झाले.
        नर्मदाकुन्डावर जावून सन्कल्पा विशयी चौकशी करुन सर्व ठरवले. सन्ध्याकाळी मैय्याच्या घाटावर दसरा सोहळा,रावणदहन कार्यक्रमाचा आनन्द लुटला.इकडे सोने लुटण्याची पध्द्त दिसली नाही.
 दुसर्या दिवशी २५/१०/२०१२ला एकादशी होती गुरुजीनी सकाळी ८वाजता बोलवले होते.पहाटे आश्रमाच्या समोरील मैय्याच्या घाटावर स्नानासाठी गेले,भ्रमनिरास झाला,दसरामेळावा सम्पला होता पण घाणीचे साम्राज्य पसरले होते,मैय्याची क्षमा मागुन पुन्हा खोलीवर आले आणि स्नान केले.
          महाराज्न्चा आशिर्वाद घेतला त्यानी आशिर्वादाबरोबर चहाही दिला,सामान पाठीला लावले आणि लक्षात आले काठी काल जीपमध्येच विसरली पण मैय्या कसलीच अडचण येऊ देत नाही,एका सेवेकर्याने काठी दिली,नर्मदे हर! नर्मदाकुन्डावर गेले एकादशी असल्याने प्रचन्ड गर्दी होती.कशीतरी गुरुजीन्जवळ पोहोचले त्यानी मला ओळखलेच नाही कालच सन्कल्पासाठी,कढईसाठी पैसे दिल्याची त्याना आठवण करून दिली तेव्हा त्यानी एकाला बोलावुन मला सन्कल्प सान्गण्यास सान्गितले,गोमुखातून नर्मदाजल एका कुपीत भरुन घेण्यासाठी गेले,घाणीचे साम्राज्य पाहुन मन खुप उदास झाले.मैय्या! तुझी थोरवी जाणण्याची आमची लायकीच नाही क्षमा कर अशी प्रार्थना करुन कुपीत जल भरुन घेतले.पुन्हा मन्दिरात आले,त्या सन्कल्प सान्गणार्या गुरुजीनी मला गोत्र विचारले आणि मला सन्स्क्रुत काय कळणार या विचाराने असेल बहुतेक महाम्रुत्युन्जय मन्त्र म्हणून सन्कल्प झाला असे म्हणुन दक्षिणा मागितली,मी पुन्हा मैय्याची क्षमा मागितली आणि मनोमनी परिक्रमेचा सन्कल्प केला.दक्षिणा दिली,गुरुजीन्कडे गेले कढईबद्दल विचारले,ते म्हणाले सवडीने आम्ही कढई करू.नर्मदे हर!मैय्यासाठी आणलेली साडी,शन्करासाठी आणलेली शाल गुरुजीना देउन मी मैय्याची वारन्वार क्षमा मागत दक्षिण दरवाजाने बाहेर पडून दक्षिणतटावरुन वाटचाल सुरु केली.
             ७कि.मि. कबीरचबुतरा गेले,दाट जन्गलाच्या मधुन छान डाम्बरी रस्ता आहे.नुकताच पावसाळा सम्पला असल्याने सारे रान हिरवी दुलई पान्घरुन पहुडले आहे त्या दुलईवर रन्गीबेरन्गी फुलान्ची नक्षी शोभते आहे.रस्त्याच्या दोन्ही बाजुना माकडे बसुन माकडचेस्टा करत होती.आणि ह्या निसर्गाच्या सोबतीने मी ओम नमो नर्मदा माई रेवा पार्वतीवल्लभ सदाशिवा असा जप मनात करत वाटचाल करत होते.हातातील काठी भलीमोठी होती,माझ्या हातात ती जेमतेमच मावत होती अवघडच होते सारे माझी छान काठी मी हरवली होती पण काठीतर हवीच.मैय्याला माझी अडचण कशी सहन होणार?तिने भुरा नावाच्या आदिवासी बन्धुला पाठवले,ते म्हणाले मैय्या तेरे हाथने भारी लाठी है ये लेके कैसे चलोगी? मेरी लाठी हल्की है ये लेलो,चलनेमे आसानी होगी.त्याना प्रणाम करुन मी ती काठी घेतली पुढे वाटचाल सुरु.
              रस्त्याने भेटणारे थाम्बत,विचारत,माताराम अकेली चल रही हो? किसिके साथ चलो.मी उत्तर देत असे,अकेली नही मैय्या है साथमे,आप लोग हो.पण मनातमात्र चलबिचल होत असे.सकाळी कबीरचबुतराला नास्ता केला होता दुपारी भोजनाची सोय झाली नव्हती.जगतपुरला आन्गण्वाडीच्या पडवीत बसून बिस्किटे खाल्ली,पुन्हा पुढे.मधे मधे थाम्बत सन्ध्याकाळी करन्जियाला पोहोचले तेव्हा ५ वाजले होते.मुक्काम कुठे करायचा हा विचार मला करण्याची गरजच नव्हती मैय्याने ती सोय श्री.प्रेमकुमार बुनकर या रिटायर्ड मलेरिया इन्स्पेक्टर यान्च्याकडे केलेली होती.
बुनकर यान्च्या बद्दल सान्गायचे झाले तर एका अपघातात त्यान्च्या उजवा पाय गुढग्याच्यावर कापलेला आहे.त्यानी  तीनचाकी स्कुटरला छप्पर करुन घेतले आहे,सामानासाठी जागा,पत्नीला बसण्यासाठी सीट करुन घेतली आहे.आणि या जोडप्याने ह्या गाडीवरुन नर्मदापरिक्रमा केली आहे तीही बावनगजामार्गे शुलपाणिच्या जन्गल मार्गाने.
    उद्या पुढे परिक्रमा मार्गाने वाटचाल करुया.

Wednesday, 12 February 2014

नर्मदे हर!
 २०११/२०१२,२०१२/२०१३ अशा दोन पायी परिक्रमा नर्मदामैय्याच्या क्रुपेने पार पडल्या.
कशासाठी केल्या मी परिक्रमा? याचे उत्तर आहे स्वानन्दासाठी.नर्मदामैय्याचे स्वरुप सुन्दर,दोन्ही तीरावरील निसर्ग सुन्दर,मला भटकायला फार आवडते.आपला भारत खुप सुन्दर आहे. त्यात ज्या भागातुन नर्मदामैय्या प्रवाहीत होते तो मध्यप्रदेश तिथली जन्गले म्हणजे भारताची फुफुस्से आहेत.हिरव्यागार शेतातील वार्यावर लवलवणारी पाती,मन्जुळ गाणारे पक्षी,पान्त्स्थाना शितल सावली देणारे व्रुक्ष,मैय्याकिनारी हिरवळीवर फुललेली हसरी रन्गीबिरन्गी फुले,स्वछ पाण्यात विहरणार्या मासोळ्या,सर्वच अप्रतिम.
        आणि तिच्या दोन्ही तिरावर वसलेली खेडी,तिथे राहणारी माणसे,मध्यप्रदेश,गुजराथ दोन्ही राज्यातील.माणूसकी,आतिथ्यशीलता,धर्माबद्दलची आस्था.परिक्रमावासीन्बद्दल असलेली श्रद्धा,सर्वच खुप भावणारे.
 नर्मदापरिक्रमा करण्यासाठी मला प्रेरणा देणारे श्री.नारायण आहिरेगुरुजी{वियोगी नारायण}सटाणा-नाशिक यानी लिहिलेले पुस्तक नर्मदे हर-नर्मदा परिक्रमा.हे पुस्तक मी वाचले १९९३ साली.तो पर्यन्त नर्मदा ही एक नदी भारताचे उत्तर,दक्षिणभारत असे भाग करते एवढीच शाळेत शिकलेली माहिती होती.पुस्तक इतके साधे-सुन्दर,दैनन्दिनीच्या रुपात लिहिलेले.१९९३ ते २०११ या काळात मी त्याची किती पारायणे केली याची गणतीच नाही.रोज मैय्याला प्रार्थना करत असे मैय्या! मला परिक्रमा करायची आहे,लवकर योग येऊ दे!पण.....
 सन्साराच्या सार्या जबाबदार्या पार पाडून इतकी ५-६ महिन्यन्ची रजा मिळण्यासाठी २०११ साल उजाडले.
     २०११च्या परिक्रमेत चालताना माझे मैय्यावरील प्रेम आधिकाधीक द्रुढ होत गेले.पण त्या परिक्रमेत मला तब्येतीने साथ दिली नाही १०००कि.मि. चालले  तेही काही वाहानाने,काही चालत.बुधनी नन्तरमात्र पुढे जबलपुरपासुन अमरकन्टक,ओम्कारेश्वर वाहनानेच परिक्रमा पुर्ण करावी लागली.ते मनाला फार लागले.
          मैय्याची क्रुपा झाली.२०१२ च्या चातुरमासा्नन्तर पुन्हा परिक्रमेला निघाले.२५नोव्हेम्बर २०१२ ते१८एप्रिल२०१३ अशा १३९ दिवसात ती पुर्ण झाली.
पुढच्या लेखात परिक्रमा आणि आलेले अनुभव.