तीर्थजननी नर्मदा परिक्रमा
सकाळी स्नान पुजा आटपुन बनकरान्चा निरोप घेउन पुढे वाटचाल सुरु केली.सम्पुर्ण रस्ता डाम्बरी असल्याने काही त्रास नव्हता पण भेटणारे एकटीच चालते आहे म्हणून टोकत,मन दोलयमान होत असे.तरेरा,रामनगर,बरबजपुर,रुसा येथे पोहोचले त्यावेळी दुपारच्या भोजनाची वेळ झाली होती रायभोजनालय पाटी दिसली म्हणून शिरले.सौ.कमलेश दिनेश राय यानी दाल-चावल ताजे करुन मला वाढले.तिथेच कपडे वाळत घालुन २वाजेपर्यन्त विश्रान्ती घेऊन पुढे निघाले.राय यानी भोजनाचे पैसे घेतले नाहीत परिक्रमावासी म्हणून उत्तम आदरातिथ्य केले.गोरखपुरला पोहोचण्यास सन्ध्याकाळचे ५ वाजले.भारती ठाकूर यान्च्या नर्मदापरिक्रमा या पुस्तकात उल्लेख असलेल्या सतिश शर्मा यान्च्या घरी आसन लावले.मुळचे पन्जाबीपन्डीत कुटुम्ब,फाळणीच्यावेळी येथे स्थाईक झाले.व्रुद्ध माताजी,तीन मुलगे आणि परिवार आहे.सतिशची पत्नी सत्किर्ती,मोठे सेवभावी कुटुम्ब.
सकाळी पुढे,सतीश-सत्किर्ती खुप लाम्बवर आले होते.चन्दना,मोहतरा,पिन्जराटोला,डोन्गरीटोला,राम्नगर,कनकधारा,मोहतरा,रत्ना येथे रस्त्यावर एक सिद्धकुटी मन्दिर होते ऊन खुप लागत होते दमलेही होते दर्शन घेउन थोडी विश्रान्ती घ्यावी म्हणून गेले,सिद्धबाबा म्हणजे आपले शेगावचे गजाननमहाराज अगदी घरचे माणूस भेटल्याचा आनन्द झाला.नमस्कार करुन प्रार्थना केली.ओट्यावर बसले.काही लोक आले,चौकशी झाल्यावर पुन्हा तेच एकटीने कशाला चालायचे वगैरे.आज तळपायाला फोड आले आहेत.गाडासराई आले,काल दिनेश राय यानी डाक्टर विजय चौरासिया यान्चे नाव सान्गितले होते म्हणून त्यान्च्याकडे गेले,दुपारचा १वाजला होता भोजन करुन पुढे जावे असा विचार होता पण माझ्या पायाला आलेला फोड पाहुन त्यानी राहण्याचा आग्रह केला,त्याना जबलपुरला जायचे होते रात्री परत येणार होते,लावले आसन.त्यान्चा पत्नी, मलगा नवीन,त्याची पत्नी,मुले अन्शिका,अन्कीत सारे कुटुम्ब मोठे लाघवी.
सकाळी पुढे निघाले,तीन कि.मि. गेले तोच मागुन नवीन मुलाना घेऊन आला,मी निघाले तेव्हा ती झोपली होती म्हणुन मी त्यान्चा निरोप न घेता निघाले तर त्यानी उठल्यावर रडून गोन्धळ घातला की आजी आम्हाला न सान्गता का गेली म्हणून नवीन त्याना घेऊन आला होता. एका दिवसाच्या सहवासात हे कुटुम्ब माझे नातेवाईकच झाले.बरगाव,सागरटोला,केवलारी,सुनपुरी,बोदर,बिझौरी,खरगेना येथे सन्त कबीर भोलेनाथ मन्दिर आहे.हर्रा,कारोपानी,येथे काळ्याहरीणान्चे अभयारण्य आहे.गिधा येथे सन्जीव मरकाम यान्चा सन्दर्भ मिळाला होता म्हणून गेले पण त्याना बाहेरगावी जायचे होते त्यामुळे चहा घेउन निघाले.गोमती ही स्वछ प्रवाहाची नदीमैय्या होती.किनार्यावर महेशसिन्ग राठौर यान्चे चन्द्रमौळी घर-ढाबा होता त्यानी हाक मारली,गेले.चहा झाला थोडी विश्रान्ती घेतली.महेशसिन्ग यान्चा मुलगा मुरली हा लहान असताना खुप आजारी होता तेव्हा त्याच्या आजीने नवस केला मुलगा बरा होऊदे त्याला घेउन नर्मदामैय्याची पायी परिक्रमा करेन.मनेन्जायटीस झालेला मुरली बरा झाला,तो आणि त्याची आजी यानी परिक्रमा केली.
पुढे निघाले.कुडागाव,बिछिया,महवीरटोला,सिमरिया,घानाघाट गेले.दिन्डोरी २कि.मि. रहिले होते आजची चाल ३०कि.मि. झाली होती.पायाचा फोड फुटला,बुट काढले ड्रेसिन्ग केले.पण चालणे अशक्य वाटू लागले. कशीतरी चालत दिन्डोरीला पोहोचले.चार दिवसात मी ८०कि.मि. चालले होते.उद्या कोजागिरी पौर्णिमा आहे.एक दिवस विश्रान्ती घ्यावी म्हणून धर्मशाळेत न जाता हॉटेल अनुराग मध्ये राहिले.
No comments:
Post a Comment