नर्मदे हर!
२०११/२०१२,२०१२/२०१३ अशा दोन पायी परिक्रमा नर्मदामैय्याच्या क्रुपेने पार पडल्या.
कशासाठी केल्या मी परिक्रमा? याचे उत्तर आहे स्वानन्दासाठी.नर्मदामैय्याचे स्वरुप सुन्दर,दोन्ही तीरावरील निसर्ग सुन्दर,मला भटकायला फार आवडते.आपला भारत खुप सुन्दर आहे. त्यात ज्या भागातुन नर्मदामैय्या प्रवाहीत होते तो मध्यप्रदेश तिथली जन्गले म्हणजे भारताची फुफुस्से आहेत.हिरव्यागार शेतातील वार्यावर लवलवणारी पाती,मन्जुळ गाणारे पक्षी,पान्त्स्थाना शितल सावली देणारे व्रुक्ष,मैय्याकिनारी हिरवळीवर फुललेली हसरी रन्गीबिरन्गी फुले,स्वछ पाण्यात विहरणार्या मासोळ्या,सर्वच अप्रतिम.
आणि तिच्या दोन्ही तिरावर वसलेली खेडी,तिथे राहणारी माणसे,मध्यप्रदेश,गुजराथ दोन्ही राज्यातील.माणूसकी,आतिथ्यशीलता,धर्माबद्दलची आस्था.परिक्रमावासीन्बद्दल असलेली श्रद्धा,सर्वच खुप भावणारे.
नर्मदापरिक्रमा करण्यासाठी मला प्रेरणा देणारे श्री.नारायण आहिरेगुरुजी{वियोगी नारायण}सटाणा-नाशिक यानी लिहिलेले पुस्तक नर्मदे हर-नर्मदा परिक्रमा.हे पुस्तक मी वाचले १९९३ साली.तो पर्यन्त नर्मदा ही एक नदी भारताचे उत्तर,दक्षिणभारत असे भाग करते एवढीच शाळेत शिकलेली माहिती होती.पुस्तक इतके साधे-सुन्दर,दैनन्दिनीच्या रुपात लिहिलेले.१९९३ ते २०११ या काळात मी त्याची किती पारायणे केली याची गणतीच नाही.रोज मैय्याला प्रार्थना करत असे मैय्या! मला परिक्रमा करायची आहे,लवकर योग येऊ दे!पण.....
सन्साराच्या सार्या जबाबदार्या पार पाडून इतकी ५-६ महिन्यन्ची रजा मिळण्यासाठी २०११ साल उजाडले.
२०११च्या परिक्रमेत चालताना माझे मैय्यावरील प्रेम आधिकाधीक द्रुढ होत गेले.पण त्या परिक्रमेत मला तब्येतीने साथ दिली नाही १०००कि.मि. चालले तेही काही वाहानाने,काही चालत.बुधनी नन्तरमात्र पुढे जबलपुरपासुन अमरकन्टक,ओम्कारेश्वर वाहनानेच परिक्रमा पुर्ण करावी लागली.ते मनाला फार लागले.
मैय्याची क्रुपा झाली.२०१२ च्या चातुरमासा्नन्तर पुन्हा परिक्रमेला निघाले.२५नोव्हेम्बर २०१२ ते१८एप्रिल२०१३ अशा १३९ दिवसात ती पुर्ण झाली.
पुढच्या लेखात परिक्रमा आणि आलेले अनुभव.

No comments:
Post a Comment