तीर्थजननी नर्मदा परिक्रमा भाग-४
पायाचे फोड थोडे बरे वाटत होते म्हणून पुढे निघायचे ठरवले.सकाळी ७वाजता हॉटेल सोडले.मन्डला नाक्यावर येईपर्यन्त पाय चालायला नाही म्हणू लागले पण तरिही चालत राहिले.किरहा टोला,जमुनिया,रहन्गी,रयपुरा,इमलय येता येता एक वाजला,पायाची आग होत होती,झाडाखाली बसले बुट काढुन पाहिले फोडावरची कातडी निघुन जखम झाली होती,मला डायबेटीस आहे,आता जास्त हुशारी करणे शहाणपणाचे झाले नसते.मी बसने मोहगावला गेले,तिथुन घुगरी,रामनगर मार्गे महाराजपुरला गेले.
दुसर्या दिवशी बसने लखनादौन मार्गे नरसिन्हपुरला गेले.रेल्वेस्टेशनवर गेले सन्ध्याकाळी ६वाजता राजेन्द्रनगर-कुर्ला गाडी होती.तिकिट काढले,गाडीत बसल्यावर टी.सी. कडून सीटही मिळाली.सकाळी नाशिकला पोहोचले.२३ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर असा आठ दिवसान्चा हा अनुभव खुप काही शिकवुन गेला.
पायाची अवस्था बघुन माझा एकटीने पायी परिक्रमा करायचा उत्साह नाहिसा झाला होता.पाय बरा झाल्यावर कार्तिकी एकादशीला सोबतीने परिक्रमेला निघायचे ठरवले.
२०११च्या परिक्रमेतील सहपरिक्रमावासी पुण्याचे माढेकर काका याना फोन केला.त्यानी पुण्याच्याच गोगटेकाका यान्चा फोन नम्बर दिला,बोलले गोगटेकाकान्शी.त्यानी सातार्याच्या आशा कुलकर्णी परिक्रमेला जाणार असल्याचे सान्गितले मग त्याना फोन केला त्या म्हणाल्या पिम्परीचिन्चवडचे श्री.रमेश खरे आणि सौ.अन्जली खरे हेही परिक्रमा करणार असल्याचे सान्गितले,त्याना फोन केला.२४ नोव्हेम्बरला ओम्कारेश्वरला गजाननमहाराज भक्तनिवासात भेटून बरोबर परिक्रमा करायचे ठरले.मी वन्दना परान्जपे,रमेश खरे,अन्जली खरे,आशा कुलकर्णी असे चौघे परिक्रमा करणार आहोत.
पाय बरा झाला,रक्ताची तपसणी केली ब्लड शुगर लेव्हल नॉर्मल होती.पाठपिशवी लावुन रोज थोडे चालत राहिले. परिक्रमेची तयारी झाली.२३नोव्हेम्बरला सकाळी ८च्या नाशिक-इन्दोर बसने निघाले,दुपारी जुल्वानिया चौकडीला पोहोचले,खरगोन बस मिळाली.या प्रवासात ऊन गाव लागले,पुरातनकाळी हे राजधानीचे ठिकाण होते,येथे ९९ मन्दिरे,९९ विहिरी आहेत त्या काळातील.गाडीतुन काही मन्दिरे पाहता आली. खरगोनला पोहोचल्यावर लगेच ओम्कारेश्वरची बस मिळाली बस सुल्रागाव,अन्जरुद,कोठी मार्गे ओम्कारेश्वरला आल्याने माझी परिक्रमा खन्डीत झाली नाही.बस ८वाजता ओम्कारेश्वरला मेळा स्थानकावर पोहोचली.कार्तिक मेळा सुरु होता खुप गर्दी होती. भक्तनिवास ३कि.मि. दुर होता,निघाले चालत.वाटेत एका मुलाने मोटरसायकलवर लिफ्ट दिली त्यामुळे १० मिनिटातच भक्तनिवासात पोहोचले.रुम घेतली,सकाळी आशाताई आणि मन्डळीन्ची भेट होणार होती.आणि २५ला,परिक्रमा प्रारम्भ.मन उचम्बळून आले आहे.

No comments:
Post a Comment