Monday, 24 February 2014

                        ॥ सार्थक जन्म-समर्पण अर्थात नर्मदाख्यान ॥

असूर सन्हारानन्तर थकून बैसले त्रिपुरारी।निढळावरचा घर्मबिन्दू एक टपकला भुमिवरी॥
त्या बिन्दुतुन प्रगटली एक कन्या सुन्दरी।कोण असशी गे मुली तू सुख देती हासरी॥
मी तर असे आपुलीच तनुजा बोले ती नमस्कारुनी।घर्मबिन्दु मधून आपुल्या जन्म माझा पावनी॥
दोन पुत्र असती आमुचे पण एक उणीव होती ऊरी।तुझ्या जन्माने सुरसे आज तिही झाली पुरी॥
आपुलीच गे पुत्री अपर्णे येई तू स्वीकार करी।येई गे मुली बैस अन्की हसुन बोले शर्वरी॥
दोन बन्धू एक भगिनी मोदे खेळती अन्गणी।सुखी ग्रुहस्थी पाहुन डोलती उमा आणि मदनारी॥
स्कन्द गजानन लपुन बैसती शोधतसे मन्दाकिनी।कोठे लपले बन्धू दोघे खुणे दाखविती त्रिपुरारी॥
विसरुनी सारी भवचिन्ता निश्चिन्त बैसले सदाशिव।नर्मम ददाति तू नर्मदे सदासर्वदा सुखी भव॥
आशिर्वचन दिलेत देवा हसुन बोले शर्वरी।नन्दिकेश्वर म्हणे देवा चला आता कैलासपुरी॥
उष्णप्रदेशी जन्मलेली ही मम कन्या कैसी ते हिम सहन करी।कुणा हाती सोपवू कोमलान्गी ही मम कुमारी॥
मेकलराज उभा राहिला हात जोडोनी सामोरी।सन्धि द्यावि मला दयाळा मनिषा आपली करीन पुरी॥
निर्धास्त झाले शिवपार्वती निघाले माघारी।देवाधिदेव सन्तोषले उजळली कैलासपुरी॥
मेकलसुता आता जाहली शिवकन्या सुन्दरी।विन्ध्य-सातपुडा दोन बन्धू सुखावले बहू अन्तरी॥
चुलबुली अवखळ होती म्हणुन रेवा म्हणती सारी।बाललिला पाहात तियेच्या आनन्दित सारी मेकलनगरी॥
दिवस चालले आनन्दाने मोठी झाली स्वरूप सुन्दरी।विवाह आता हिचा करावा मेकल्राज मनी विचार करी॥
योग्य वराचा शोध घेतसे भारतवर्षा माझारी।राजबिन्डा शोणन्रुप तो राज्य करीतसे शेजारी॥
सर्वार्थाने योग्य असे हा विचार आला न्रुपान्तरी।प्रस्ताव पाठवी मेकलराज शोणन्रुपाच्या दरबारी॥
निर्मल सुन्दर मम कन्येचा स्वीकार करावा राजेश्वरी।किर्ती एकुनी नर्मदेची शोण तिचा स्वीकार करी॥
कसा असेल राजपुत्र ?कोण योग्य वर्णन करी।जुहिला!प्रिय सखे पाहुन येई कैसा असे मम सख्याहरी॥
सजली धजली जुहिला नर्मदेसम पोषाख करी।पायीची नुपुरे झन्कारीत ठुमकत जातसे बाहेरी॥
पुर्वदिशेला वसली होती निसर्गरम्य शोणपुरी।वर्तमान जाणून घेण्या शोणन्रुपाचे आली जुहिला सेवेकरी॥
नटली सजली जुहिला देखुन स्तब्द झाला शोणसखा।स्वर्गिची वाटे अप्सरा मोहितसे मम चित्ता॥
राजबिन्ड्या शोणास पाहुनी जुहिला मनी हरखली।मदनबाणे विद्ध होवुनी कर्तव्य आपुले विसरली॥
येई गे सुन्दरी मम चित्तचकोरी शोणराजा हर्षला।मी नसे आपुली वधू असे न बोले ती जुहिला॥
गैरसमजाने पार पडला भव्य लग्न सोहळा।विसरुनी कर्तव्य आपुले रमली राणी ती जुहिला॥
बहुत दिन जाहले काहीच न कळे वार्ता।चिन्तीत होवुनी स्वतः निघाली मग ती शिवसुता॥
दुरुनच दिसला दिपोत्सव आसमन्त सजला धजला।स्वागतास आपुल्या नगरी सजली मनी हरखली शिवबाला
समीप जाता तिने देखिला दरबार तो भरलेला।सिन्हासनी बैसले होते शोणन्रुप अन राणी जुहिला॥
ह्रदयभेदक द्रुश्य पाहुनि क्रोधीत झाली नर्मदा।नर्मम ददाति ब्रिद आपले विसरुन होई ती क्रुता॥
अगे पापिणी मम दासी तू काय म्हणू मी तुला।क्रुतघ्न कामिनी आज शपिते बघ मी तुला॥
जलरूप व्हा याच क्षणी दोघे लागा पतित प्रवाहाला।थाम्ब जुहिले! दुर्गन्धीत होइल पाणी कुणी स्पर्शी तव जला
मी ही होते जलरूप जाते स्वदेश काजा।सन्तापाने गर्कन फिरली रेवा निघाली अस्ताचला॥
सुन्न होवुनी दुःखीत मने शोण प्रवाह पडला।उन्चावरुनी उडी घेऊनी पुर्वेकडे निघाला॥
जुहिलेचा प्रवाह राहिला त्याच ठिकाणी स्तब्द्सा।मेकलतली आजही आहे वाहता तो कसानुसा॥
नर्मदा मग जलरुप झाली ज्या स्थला।माईकी बगिया म्हणती आज त्या वनस्थला॥
दुःखीत रेवा विव्हल होऊनी गुप्त होतसे भूमित।मेकलराजही झाला किम्कर्तव्यमुढ अन दुःखीत॥
भुमिगत राहुनी नर्मदा करीतसे तपस्या।दिन महिने साल बारा पुरी झाली तपस्या॥
प्रसन्न झाले महादेव सान्ग म्हणाले मनी काय आहे तुझ्या।आपुलीच पुत्री मी पण काय नशिबी हे माझ्या॥
जनहितार्थ जन्म तुझा सुरसे शीघ्रही कार्यारम्भ करी।महानद असशी तू जल आता प्रवाहीत करी॥
आद्न्या प्रमाण पिताश्री धेय्य माझे मज कळले।कैक जन्मान्चे पुण्य माझे या जन्मी फळले॥
अमरकन्ठ राजधानी पर्वतमाथ्यावर वसली।रम्य मनोहर वने उपवने असे बहु ही सजली॥
मेकलराजा करी तयारी नर्मदावतरणाची।सुन्दर कुन्ड बान्धविले शोभा तिथे गोमुखाची॥
शिवस्मरण करुनी रेवा गोमुखाने कुन्डान्तरी प्रवेशली।सुन्दर स्वच्छ नीलजल रुपे प्रवाहीत ती झाली॥
निघाली ती सुरसरिता लोककाजा कारणे।खळ्खळ अवखळ नाचत निघाली पश्चिमेकडे॥
सुन्दर घनदाट उपवनी बसले होते कपीलमुनी।त्रुषा त्यान्चि शान्तविण्यावेगे तिने घेतली उडी॥
कपीलमुनी नम्रतेने करिते झाले अभिवादना।स्विकारुनी ते नम्रपणे पुढे निघाली पावना॥
घोर तपस्या त्या वनी करीत होते दुर्वासमुनी।पुढे निघाली जलदुग्धाने क्षुधा त्यान्ची शान्तवुनी॥
घोर काननी प्रवेशली मग आनन्दे तमसा।लोककल्याणास्तव प्रवास करितसे विपाशा॥
मार्गी मग तिला मिळाल्या कपिला अन करगन्गा।करन्जव्रुक्षराजीतुन गळा पडतसे कोमल कण्वा॥
तुडारमैय्या सवे घेवुनी चालली अमल्डेह मागे टाकुनी।रुषाही पडले मागे गोरखपुरास मिळे सिवनी॥
अगणित गावे अगणित नगरे पर्वत अन घनदाट जन्गले।फुलती उपवने फळती झाडे अनेक पक्षि गाती मन्गले
सुभिक्षीत करत चालली आनन्दित ती धरणी।पतितपावन जिची जलधारा तीच असे तीर्थजननी॥
मार्कन्डेय भ्रुगु वशिष्ठ कर्दम शौनकादि।नारद पिप्पलाद सनतकुमार नाचिकेत सनकादि॥
सर्व देव मुनि मनुज वन्द्या ही मानिनी।हर्म्यदा ही शर्मदा ही दिव्य वरदायिनी॥
जलचर नभचर अगणित सुन्दर पक्षीगण।सुखे राहती मत्स्य कच्छ अगणित मीन॥
भारहारिणी सुखदायिनी माता तीर्थशिरोमणी।भववारिधी भयहारिणि माता पतितपावनी॥
सत्य त्रेता द्वापार युगी होता मोठा सन्मान।नतद्रष्ट या कलियुगी मात्र सदा होतो अपमान॥
तरिही तुझे प्रेम माते लाभते सर्वा समान।नमस्ते नमस्ते मैय्या तव चरणी सदा प्रणाम॥
अमरकन्ठ नेमावर शुलपाणि।बान्दराभान गोराग्राम जमदग्नी॥
इन्द्रवरण तपोवन अन बुधनी।भाखा कवाट तसेच कडीपानी॥
असा चालला प्रवास शिवकन्येचा।पुर्वपश्चिम प्रवाहित दक्षिणोत्तर तीरान्चा॥
समय आला आता जीवन सान्गतेचा।समोर होता रत्नसागर सुन्दर तो साचा॥
दर्शनान्तरी मैय्या स्तब्द झाली क्षणभरी।नतमस्तक होवुनी उभी राहिली विमलेश्वरी॥
विनम्र अभिवादन करुन म्हणे पित्याला।सफल झाले मम जीवन आद्न्या द्यावी आता मला॥
नर्मदे तू महाभागा सर्वपापहरी भव।तव जलान्तरीच्या शिला सर्व होतील शिव॥
वन्दन करुनी मग पित्याला रेवा पुढे सरकली।रत्नसागरामध्ये मग ती सामावली॥
                             नर्मदे हर!नर्मदे हर! नर्मदे हर!





No comments:

Post a Comment