Friday, 1 June 2012

तीर्थजननी नर्मदा परिक्रमा

१०/११/२०११.त्रिपूरीपॉर्णिमा होती.ओम्कारेश्वरगावात भक्त्तान्ची मान्दियाळी होती.खुप लोक पन्चक्रोशी परिक्रमा करुन आलेले होते.जागा मिळेल तिथे लोकानी आपला बाड-बिस्तारा लावला होता.तीन दगडाची चूल मान्डून स्वयम्पाक चालु होता.मी एका ठिकाणी बसुन पहात होते,बापरे! असा स्वयम्पाक करणे मला कसे जमणार?मी स्वतःशीच बोलले,बाजुला एक बाबाजी बसले होते; ते म्हणाले,बेटी मैय्याने आपकेलिये अलग काम तय किया है,खाना बनाना आपका काम नही परिक्रमामे आपको बना बनाया खाना मिलेगा ये मेरी बात याद रखो.मला मोठे आश्चर्य वाटले याना माझ्या कामाबद्दल कसे माहीत?आणि खरोखर्च सम्पुर्ण परिक्रमेत मला एकदाही स्वयम्पाक करावा लागला नाही.
                 ११/११/२०११.सकाळी सर्व आवरून आम्ही नर्मदेच्या दक्शिण तीरावरील गोमुख घाटावर आलो,जितेन्द्रशास्त्रीनी आम्हाला सन्कल्प पुजा सान्गितली.कढई गुरुजीन्च्या घरुनच करुन आणली होती,कन्या पुजन करुन त्याना हलवा{गोडाचाशिरा} दिला,नन्तर सर्वानी प्रसाद घेउन परिक्रमेसाठी प्रस्थान ठेवले.प्रथम नगरपालिकेच्या कार्यालयात जाउन प्रमाणपत्र घेतले.आणि मैय्याला{इथुन पुढे नर्मदेचा उल्लेख मैय्या असाच असेल.}उजव्या हाताला ठेवून चालायला सुरवात केली.आज १२कि.मि.वरील मोरटक्का येथिल जैन धर्मशाळेत मुक्काम करायचा होता.२कि.मि. चाललो असु-नसु मोठा भाग्याचा योग आला.श्रीगोन्दवलेकरमहाराजान्चे अनुयायी श्रीराममहाराज भेटले.आम्हाला पाहुन थाम्बले,आशीर्वाद दिला.म्हणाले,सामान बरेच घेतले आहेत चालणे कठीण जाईल काही सामान माझ्या आश्रमात ठेवा,परिक्रमा पुर्ण झाल्यावर घेऊन जा.मोरटक्क्याला मी भोजन घेउन येतो पोहोचलात की फोन करा.
     महाराजान्चे पटले,पाठपिशवी खुपच जड होती तरी गुरुजी म्हणाले म्हणून आम्ही काही सामान आधीच त्यान्च्या घरी ठेवले होते पण तरिही अजुन कमी करणे गरजेचे होते. निघता करता आधीच उशीर झाला होता डोक्यावर ऊन मी म्हणत होते रस्त्याच्या दुतर्फा झाडी असुनही घामाघुम झालो होतो.१२कि.मि.वरील मोरट्क्क्याच्या जैन धर्मशाळेत पोहोचण्यास दुपारचे ३ वाजले.तिथे खोली घेतली १००रू. श्रीराममहाराजाना फोन केला.ते अक्शरशः १०मिनिटात डबा घेउन आले.आम्हाला पोटभर होउन आणखी ४/६ जणाना अन्न पुरले.महाराजान्जवळ  बरेचसे सामान देउन बोजा हलका केला.आजचा मुक्काम जैन धर्मशाळा मोरटक्का.

No comments:

Post a Comment