१२/११/२०११ पहाटे धर्मशाळेतील विहिरीवर स्नान केले गार गार पाण्याने नर्मदामैय्याची पुजा आरती करुन पुढे प्रस्थान ठेवले.बाहेर टपरीवर चहा घेतला टपरीवाल्यालाच पुढचा मार्ग विचारला,मोरटक्का-खेडीघाट याना जोडणार्या मैयावरील पुलाखालून मैय्याच्या किनार्यावरुन चालु लागलो.शेतासाठी लावलेल्या पाण्याच्या पम्प-मोटारीन्च्या वायरीन्चे जन्जाळ पसरलेले होते त्यातून वाट काढत चालावे लागत होते.थोड्याच वेळात रेल्वेचा पूल आला,छोटी टेकडी चढुन वर आलो. थोडे चाललो तेवढ्यात एका माणसाने हाक मारली,माताजी परिक्रमाका रास्ता उबड-खाबड होता है,बिना हातमे डन्डा लिये चलनेमे कठिनाई आएगी मै आपको डन्डा देता हु.उसने बाम्बुका डन्डा बनाके हम सबको दिया मैय्याके प्रेमका पहिला प्रमाण मिला.
१०कि.मि.पर टोकसरका गोमुखाआश्रम आला,सकाळचे १० वाजले होते आश्रमाचे महाराज म्हणाले भोजनप्रसादी पावो फिर आगे बढना; आम्ही ठीक आहे म्हटले,धुतलेले कपडे वाळत घातले,आश्रमाच्या नोन्दवहीत आमच्या नावाची नोन्द केली आमच्याकडील प्रमाणपत्राच्या वहीत त्यान्चा शिक्का मारून घेतला.आश्रम खुपच सुन्दर आहे.तिथे गायत्रीमन्दिर्,शिवमन्दिर आहे,एका कुन्डात गोदावरी प्रकट झाली आहे असे म्हणतात आमच्या नाशिकच्या गोदावरीचे{गन्गा} दर्शन झाले अगदी घरी आल्यासारखे वाटले. भोजनाला तिक्कड{गव्हाच्या जाड पोळ्या} आणि दाल{आमटी} होती.भोजन होत आले आणि एकजण महापुरण महापुरण असे म्हणत काहीतरी वाढायला आला,मला वाटले आपले गोड पुरण आहे पण महापुरण म्हणजे आता भोजन पुर्ण झाले यानन्तर काही मिळणार नाही.मजा वाटली.
१२ वाजता पुढे निघालो.पीतनगर्,कान्करिया,अशी गावे पार करत मढी येथे पोहोचलो,प्रत्येक गावात लोक आदराने बोलावत चहा पाण्याचा भोजनाचा आग्रह करत. नमस्कार करीत. मढीच्या आश्रमात पोहोचत असताना मोठ्या नागराजाने दर्शन दिले,तो आम्हाला उजवी घालुन गेला,पण आमचीमात्र पाचावर धारण बसली. तिथे मुक्कामाला राहायचे नाही असे ठरवले.तसेही रावेर तिथुन फक्त ३ कि.मि. होते,चहा घेउन निघालो.
शेतान्च्या बान्धावरुन शेतातुन वाट काढत चाललो होतो . आता ओढ होती आमच्या श्रीमन्त थोरले बाजिराव पेशवे यान्च्या दर्शनाची.रावेरला पोहोचण्यास ५ वाजले,सन्ध्याकाळ झाली होती.एका मुलीने सरपन्चान्चे घर दाखवले.त्यान्च्या पडवीत आसन लावले.त्यानी मोठ्या आदराने चहा-पाणी केले.बाजिराव राऊन्ची समाधी त्यान्च्या घरासमोरच होती,दर्शनाला गेलो.राऊबद्दलच्या अभिमानाने उर भरुन आला.डोळ्यातुन घळाघळा पाणी वाहत होते.समाधीपुढे नतमस्तक झालो.राऊ! तुम्ही होतात म्हणून आज आम्ही आहोत! फक्त ४०वर्शान्चे आयुश्य पण सुर्यासारखे तेजस्वी.
खुप दमायला झाले होते.मैय्याची सान्जारती करुन भोजनप्रसाद घेतला.सरपन्चान्बरोबर खुप गप्पा झाल्या. समाधी लवकरच डुबणार आहे का? असे विचारले तेव्हा ते म्हणाले,नाही समाधी भोवती १०फुट ऊन्च सन्रक्शक भिन्त बान्धली जाणार आहे.अॅकुन खुप समाधान वाटले.आता विश्रान्ती.

No comments:
Post a Comment